मेटेपार ग्राम पंचायत येथे घरकुल योजनेमध्ये झाला मोठा भष्टाचार
घराचे बांधकाम न करता उचलली संपुर्ण रक्कम
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालुक्यातील मौजा मेटेपार ग्राम पंचायत येथे घरकुल योजनेअंतर्गत घराचे बांधकाम न करता संपूर्ण रकमेची उचल केली असून हि बाब मौजा मेटेपार येथील मिराबाई सदाशिव जीवतोडे या महिलेच्या नावावर उचलण्यात अाली पुर्ण रक्कम या महिलेला २०१० - ११ मध्ये घरकुल मंजुर झाले होते व योजनेअंतर्गत घर बांधण्यात आले. परंतु पुन्हा २०१९ मध्ये घरकुल मंजुर होऊन आले. कुणाला एक वेळा सुद्धा घरकुल मिळत नाही. कित्येक लाभार्थीचे घर पडले आहे ते कावळ्या प्रणाने एक टक नजर लावून वाट बघत असते कधी अामचे घरकुल मंजुर होतील. पण त्यांना न मिळता पुन्हा जुण्या लाभार्थीला लाभ मिळत असते. खाल पासुन वर पर्यंत भष्टचारी अधिकारी बसुन असते म्हणुन अशा प्रकारचे काम पैशाच्या जोरावर होत असते. ज्या ग्राम सभेच्या ठरावामध्ये त्यांचा नाव वगळले असता शुध्दा घरकुल च्या ऑनलाईन यादीमध्ये नाव कसे मंजूर होऊन आले ? हा प्रश्न मेटेपार वासीयाना पडला आहे.हा घोळ कुनी केला,कसा झाला? या मध्ये मोलाचे सहकार्य म्हणजे ग्राम पंचायत चे कॉम्पूटर ऑप्रेटर अकबर रामटेके यांचे यात हात असल्याचे समजते. या नंतर अभियंता यांचे मोठा सहकार्य आहे.ग्राम सेवक हे मेडीकल च्या रज्जेवर असता ही संपुर्ण घटणा घडली अाहे. या सर्वाच्या सहकार्याने मिराबाई सदाशिव जीवतोडे या लार्भातीने जुन्या घरकुलच्या घराचा बांधकाम दाखवून नविन घरकुल ची पुर्ण रक्कम उचलुन गाळ केली. जे अभियंता चौकशीला आले होते त्यांनी त्या इमारती फोटो काढण्यात आले किंवा बगीतले तेव्हा त्यांना हा बांधकाम कधीचा आहे का कळले नाही ? या अभियंताला मोठी रक्कम देण्यात आली.म्हणूनच पुर्ण बांधकाम झाल्याचे वरीष्ठाना दाखविण्यात आले. अाणि तात्काल बिल संपुर्ण काढण्यात आले.प्लास्टर झाला नाही म्हणून कित्येक लाभार्थी पंचायत समीती मध्ये चक्रा मारीत असतात.त्यांचे बिल निगत नसतात.या लाभार्थी चे दोन महीण्यातच कसे का बिल निगाले.या मध्ये कीती अभियंता किंवा कर्मचाऱ्या ने सहकार्य केले आहेत. त्यांची तात्काल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. आणि जो भष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करून तात्काल दंडाची व निलबंनाची कार्यवाई करण्यात यावी.अशी मेटेपार वासिय गावकऱ्याची मांगणी होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!