स्वच्छता दुताचा केला सत्कार कृष्णा टॉवर सोसायटीचे सामाजिक भान



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : -  दि.23 मे 2020 समाजासाठी सातत्याने स्वच्छतेचे दूत म्हणून काम करणाऱ्या सामान्य माणसाच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करून कृष्णा टॉवर सोसायटी तुकूम येथील रहिवाशांनी आपले सामाजिक भान जपले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे.यादरम्यान अखंड व सतत सेवा देणाऱ्या कृष्णा टॉवर सोसायटी तुकूम येथे स्वच्छता राखण्यास मदत करणारे स्वच्छतादूत आनंद समर्थ यांचे कृष्णा टॉवर सोसायटीच्यावतीने त्यांच्या या कार्याबद्दल सत्कार केला आहे.

प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या स्वच्छता दुतांमुळे अवतीभोवतीच्या समाजाला अधिक उत्तम जीवन जगता येत आहे. स्वतः कठीण प्रसंगी काम करून इतरांसाठी राबणारे हे हात प्रेरणादायी आहेत.

यावेळी कृष्णा टॉवर सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र झोडे, सचिव  विश्वकर्मा, कोषाध्यक्षा श्रीमती ममता नुत्यालवार, श्री.विजयसिंग सोलंकी, लक्ष्मीनारायण नुत्यालवार, अशोक पोतवार, एम.उस्मानी, श्री.गहरोत्रा, श्री.बाराहाते, श्रीमती झोडे, श्रीमती उस्मानी, डॉ. विजयता सोलंकी सर्व सदस्य तथा रहिवाशांनी सोशल डिस्टन्सीगचे पालन करत भेटवस्तू  देऊन  व टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!