इतर पिकांकडे शेतकऱ्यांचा कौल.

इतर पिकांकडे शेतकऱ्यांचा कौल.

खर्चाच्या तुलनेत धानाला कमी भाव मिळत असल्याची शेतकऱ्यांची खंत.






मूल (प्रकाश चलाख)

खर्चाच्या तुलनेत धानाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा इतर पिकाकडे कौल दिसून येत आहे. या वर्षी धान पिका व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे मोर्चा वळविल्याने धाना व्यतिरिक्त इतर पिकाचे क्षेत्र तालुक्यात वाढणार असल्याचे संकेत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून विदर्भात परिचित आहे. या तालुक्यात धान पिकाखालील ला ग वडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.तालुक्यात धानाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असल्याने राईस मील यांची संख्या जास्त आहे. याच मिलमधून उच्च प्रतीचा तांदूळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर विक्रीसाठी पाठविला जातो. या परिसरातील शेती ही मुख्यत्वे निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असून कोणतेही मोठे संसाधने उपलब्ध नाहीत. परंपरागत धान शेती लागवड परिसरात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु धानाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कौल धान पिका व्यतिरिक्त इतर पिकाकडे दिसून येत आहे.

शेतीचे मुख्यत्वे ओलिताखालील व कोरड वाहू असे दोन प्रकार पडतात. शेतकरी प्रमुख्याने ओलिताखालील सिंचित किंवा साधंन असेल तरच धानाचे उत्पन्न घेतो. कारण धान पिकाला धान निघेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. याउलट कोरडवाहू क्षेत्रात निसर्गाच्या भरोशावर इतर पिकांची लागवड करून उत्पादन घेतले जाते. असे क्षेत्र तालुक्यात फार कमी आहे. त्यामुळे परंपरागत धा न शेतीलाच शेतकरी पहिली पसंती देत आहे.

या हंगामात धानाला महामंडळाकडून धान्य खरेदी करण्याचे आदेश आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकरी महामंडळाला आपला धान देत आहेत. याअंतर्गत महामंडळाकडून धानाला योग्य हमीभाव अधिक बोनस दिल्या जात आहे. योग्य हमीभाव अधिक बोनस मिळून धानाला 2500/- रुपये इतपर्यंत किंमत मिळत असून खुल्या बाजारात या धानाला इतर व्यापारी 2000/- ते 2200 / रुपये किंटल प्रमाणे खरेदी करीत आहेत. वास्तविकता हमी भावानुसार किंवा काही फरकाने सरकार ने व्यापाऱ्यांना खुल्या बाजारातून धान खरेदी करण्याचे आदेश दिल्यास तो निर्णय शेतकऱ्यांचा हिताचा होईल. परंतु यांचेवर कोणाचेही वचक नसल्याने शेतकरी, व्यापारी, व शासन अशी त्रिशंकू साखळी निर्माण होऊन या त्रिशंकू साखळीत धान उत्पादक शेतकरी भरडला जात आहे.

"महामंडळाकडून योग्य हमीभाव देऊन खरेदी केलेल्या रकमे चा परतावा शेतकऱ्यांना उशिरा मिळत असल्याने अनेक शेतकरी आपला मा ल गरजे अभावी कमी किमतीत खुल्या बाजारात विकत आहेत."

मजुरी, कृषी निविष्ठा इत्यादींचे दर गगनाला भिडले असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नसल्याने शेतकरी इतर पिकाकडे वळत आहे.

शासनाच्या "उन्नत शेती- प्रगत शेती"योजनेअंतर्गत असणाऱ्या सवलतीचा लाभ हा थेट शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या योजना शेतकऱ्यांसाठी की धनदांडगे यांसाठी? अशीही खंत बळीराजाने व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी शेती करतो म्हटला तर त्याला शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने परंपरागत शेती शिवाय त्याच्याकडे पर्याय नसल्याचे चित्र आहे.

नैसर्गिक आपत्ती, वन्यप्राण्यांचा हैदोस व इतर आपत्तींना तोंड देत शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हातात पीक येईपर्यंत कसलीही शाश्वती नसते. तरीपण अशाही परिस्थितीत त्याला आपला गाडा पुढे हाकलन्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

दरवर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असल्याने अनेक शेतकरी धाना व्यतिरिक्त इतर पिकांना पसंती देऊन कपाशी, तूर व इतर पिकांची निवड करून लागवड करीत असल्याचे परिसरात दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!