सिंदेवाहीत दुकानदाराकडून बेभाव विक्री ग्राहकांची लूट

अधिकच्या भाव वाढीने ग्राहकांची लुट


जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही)|
दुकानदाराकडुन वस्तुच्या भाव वाढ करून अधिकच्या दराने वस्तुची विक्री करीत असुन ग्राहकांची लुट करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्याण संबंधीत विभागाने लक्ष घालावे अशी मागनी परीसरातील नागरीकांनी केली आहे.
आधीच कोरोना प्रादुर्भावाने लाकडाउन असतांना हाताला काम नाही. जवळ पैसा पन नाही.
जेवढं होत नव्हतं आतापर्यंत नागरीकांनी कसे बसे कुटूंबाचा गाढा ओढत चालवत आहेत.
सलग लाकडाउन मुळे अनेक कुटूंबांना अनेक गरजावु वस्तुची गरज निर्माण झाली आहे.
आता संचारबंदी कमी केल्याने व दुकाने सुरू झाल्याने जो तो व्यक्ती गरजावु साहित्य खरेदी करायला निघाला आहे.
किराना सामान, कपडे, घरउपयोगी साहित्य यासारखे वस्तुची खरेदी करावं लागते.
परंतु आता दुकानदारांनी आपल्याच स्वंयघोषीत दर वाढवल्याने गरीब लोकांचे कंबरडे मोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लाकडाउन मध्ये वस्तु येत नसल्याचे दुकानदाराकडुन सांगण्यात येत अाहे. तरीपन जुन्याच वस्तुच्या किंमती वाढवुन ग्राहकाकडुन लुट करीत आहेत.
शासन व प्रशासन वारंवार अधिक भाववाढ करू नका. तसे झाले तर शासन ,प्रशासनला कळवा.असं असलं तरी भाव वाढीची तक्रार सर्व सामान्य ग्राहक करीत नाहीत.
आपन कशाला लावुन घ्यायची अशी सर्व सामान्य ग्राहकांची मानसिकता असल्याने दुकानदाराकडुन लुट सुरू आहेत.
वास्तविकता जुनेच वस्तु नविनतर आले नाही मग भाव वाढेलच कसा असा प्रश्न निर्माण होत असला तरी मन मारून मुक संम्मतीने गरजावू वस्तुची खरेदी करावीच लागते हे सत्य आहे.
यात नविन वस्तु येत जरी नसली तरी दुकानदारांनी वाजवी भावानेच ग्राहकाना वस्तुची विक्री करावी अशी मागनी आहे तर संबंधीत विभागाने याकडे लक्ष घालावे अशी मागनी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!