चिमुर तालुक्यातील,मौजा पारडपारचा नितेश बाळकृष्ण शेंडे बनला,"महशुल प्रशासनाचा बाॅस!



मोठ्या झाडाच्या जंगलाच्या पट्यावर विटाभट्टी सुरू कसी ?कुणी परवानगी दिली?प्रदुशनाच्या नियमांचे काय?


नितेश शेंडे पुढे चिमुरचे महशुल विभाग अक्षरशः हतबल ? लाजीरवाणी बाब!

चिमूर - तालुका प्रतिनिधी  ( केवलसींग जुनी )
       
चिमूर : - मौजा पारडपार येथील नितेश बाळकृष्ण शेंडे हा मागील ४ वर्षांपासून,मोठ्या झाडाचे जंगल असलेल्या,सरकार अखत्यारीत भुमापण क्रमांक २३०/१ वर अवैधपणे विटाभट्टीचा व्यवसाय करीत असून,याच्या विटाभट्टीच्या व्यवसायाला परवानगी दिली कुणी?व कोणत्या नियमाला अनुसरून दिली? हा मुद्दा अतिशय गंभीर व तितकाच संतापजनक असून चिमुर महशुल विभागाचे चौफेर धिंडवडे काढणारा दिसतो आहे.मात्र,नितेश शेंडे यांच्या विटाभट्टीचे काम आजच्या स्थितीत सुध्दा सुरू असून,चिमूर महशुल विभागाचा तो बाॅस असल्याचे सध्यातरी चित्र दिसते आहे.
       मोठ्या झाडाच्या जंगलाच्या पट्यावर कोणालाही खाजगी व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.एवंन विटाभट्टी व्यवसाय हा प्रदुर्शनच्या अखत्यारीतला भाग असल्याने,हा व्यवसाय तर जंगल पट्यावर करताच येत नाही.असे असताना मागील ४ वर्षांपासून नितेश शेंडे हा मोठ्या झाडाच्या जंगलाच्या पट्यावर विटाभट्टी व्यवसाय करीत आहे.
        मोठ्या झाडाच्या जंगलाच्या पट्यावर नितेश शेंडे हा मागील ४ वर्षांपासून विटाभट्टीचा व्यवसाय करीत असल्याचे जांभुळघाट तलाठी जिवन येरमे म्हणतात,"मग प्रश्न हा पडतो,चिमुरच्या महशुल विभागाचे सातत्यपुर्वक नितेश शेंडेच्या विटाभट्टी व्यवसायाकडे दुर्लक्ष का?
       काय? हा नितेश बाळकृष्ण शेंडे चिमुरच्या महशुल विभागाचा बाॅस आहे? चिमूर महशुल विभाग,नितेश शेंडे पुढे अक्षरशः हतबल झाले आहे?हतबलतेचा नेमका काय प्रकार आहे? नितेश शेंडेच्या अवैधपणे विटाभट्टी व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यामागचे कारण,अर्थपूर्ण लेनदेनचा प्रकार आहे काय?की राजकीय दबाव आहे? राजकीय दबाव असेल तर,तो दबाव आणणारा महाशय कोण?
     नितेश शेंडे पुढे कायदा गुलाम आहे की लाचार आहे?कायद्याला गुलाम व लाचार करणारे महशुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोण?कायद्याला गुलाम व लाचार समजणाऱ्या,"अशा,अधिकारी व कर्मचाऱ्यांची शासनाला गरज आहे काय?यावर आता महाराष्ट्र शासनाने विचार करण्याची गरज असल्याचे चिमूर तालुक्यातील जाणकारांचे मत आहे.
     नितेश शेंडेच्या विटाभट्टी व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यामागचे कारणे,जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोधून,संबंधीत चिमूर महशुल विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित का म्हणून करु नये? 
      नितेश शेंडे हा मोठ्या झाडाच्या जंगलाच्या पट्यावर विटाभट्टी व्यवसाय करीत असल्याचे माहीत असतानाही,महशुल विभागाने नितेश शेंडेच्या विटाभट्टी व्यवसायाकडे सातत्याने दुर्लक्ष करणे,हा महशुल विभागाचा प्रकार कर्तव्य हिनतेच्या भागात मोडत नाही काय? असे अनेक प्रश्न व मुद्दे महशुल विभागाच्या बाबतीत उपस्थित होतात.
         मात्र,सध्याच्या स्थितीत नितेश शेंडे हा चिमुर महशुल विभागाचा बाॅस असल्याचे चित्र आहे तर चिमूरचे महशुल प्रशासन त्याच्यापुढे हतबल असल्याचे वास्तव्य समोर आले आहे.ही महशुल विभागासाठी लाजीरवाणी बाबच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!