बल्लारपूर आढळला पहिला पॉझिटिव, चंद्रपुरात रूग्णांची संख्या 14 #corona
चंद्रपूर कोरोना अपडेट
रुग्णांची संख्या १४ वर
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 वर पोचली आहे. आज दुपारी बल्लारपूर येथील ३७ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील नागरिक मुंबईतील धारावी वस्तीमधून 20 मे रोजी बल्लारपूर शहरात पोहचला होता. या व्यक्तीला आला त्याच दिवसापासून संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात आले होते. 22 मे रोजी सकाळी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या रुग्णासोबतच जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रूग्णाची संख्या 14 झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!