चिमूर चे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचा धाडसी उपक्रम



पायदळ प्रवास करीत असलेल्या मजुरांना स्वगावी जाण्यासाठी दिले ४ चाकी वाहन उपलब्ध करून

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.०७/०४/२०२० रोजी पोलीस निरीक्षक पोस्ट चिमूर स्वप्निल धुळे हे पो. स्टाफ सह कोरणा विषाणू संसर्गजन्य रोगां संबंधाने पोलीस गाडीने पेट्रोलिंग आमडी बेगडे परिसरात करीत असताना  काही मजूर त्यांचे जवळ असलेले धान्य व इतर वस्तू सामान डोक्यावर घेऊन पायदळ येतानी दिसले त्यांना पायदळ येण्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी मजुरीचे कामावरून  खांबाडा मार्गे साधन उपलब्ध नसल्याने पायी चालत आलेलो आहोत व नांदेड ता. सिंदेवाहि  या गावी येथून अंदाजे ४० किलोमीटर जावयाचे आहे.असे सांगितल्याने पोलीस निरीक्षक धुळे पोस्ट चिमूर व पोलीस स्टॉप पोलीस हवालदार सोनुले नापोशि किशोर बोढे पोशि सतीश झिलपे भारत घोळवे शैलेश मडावी चालक पोशी विजय उपरे यांनी पोलिसांच्या प्रतिमेला शोभेल असे काम करून तात्काळ सदर पाच मजूर यांना त्यांचे स्वगावी जाणे करता वाहन उपलब्ध करून देऊन मजुरांना त्यांचे स्वगावी रवाना केले सर्व मजुरांनी पोलीस स्टेशन चिमूर चे पोलीस निरीक्षक  स्वप्नील धुळे पोलीस हवालदार सोनुले नापोशि किशोर बोढे पोशि सतीश झिलपे भारत घोळवे शैलेश मडावी चालक पोशी विजय उपरे व संपूर्ण कर्मचारी पोलिस स्टेशनची चिमूर यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!