चौदा क्विंटल सत्तर किलो भाजीपाला गरजूंना वाटप
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या सरकार ग्रुप चे सर्वत्र होत आहे कौतुक
सरकार ग्रुपचे संस्थापक
कशिफ खान यांचा पुढाकार
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - वरोरा स्थानिक सामाजिक संघटना सरकार ग्रुपचे अध्यक्ष कासिफ खान यांनी नेहमी सारखे सामाजिक बांधिलकी जपत स्वतः पुढाकार घेऊन आपल्या ग्रुप कडून आज वरोरा शहरात ठीक ठिकाणी गरजू लोकांना टमाटर,कांदे भेंडी,पालक,चौडी,आलू,काकडी,फुलकोबी,ढेमस,मिरची, सांभार, च्या वेगवेगळ्या किट तयार करून जवळपास तेराशे लोकांना केला वाटप हा भाजीपाला वाटप करताना कोरोना संदर्भात दिलेले निर्देश पाळन्यात आले.
कोरोना व्हायरसमुळे देश पूर्णतः लाकडाऊन करण्यात आला आहे त्यामुळे हातमजुरी करणारे मजूर हे घरातच राहत असल्याने त्यांच्या कडे पैश्या स्वरूपात मोठी अडचण निर्माण झाली आहे मजूर वर्ग कमवेल तर खाईल अशी मजुरांची अवस्था असते या परस्तीतीची जाणीव ठेवत सरकार ग्रुप चे संस्थापक कासिफ खान यांनी या आधी सुद्धा आवश्यक किराणा किटचे गरजू लोकांना दोनदा वाटप केले आहे त्याच प्रमाणे

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊन असे पर्यंत सरकार ग्रुप नेहमी गरजू लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहणार असल्याचे संस्थापक कासिफ खान यांनी सांगितले असून गरजू लोकांना किंवा शासनास टीम वर्क ची काही गरज भासल्यास सरकार ग्रुपशी संपर्क साधावा अशी विनंती सरकार ग्रुपचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते काशिफ खान यांनी केली आहे.आज भाजीपाला वाटपाच्या वेळी सरकार ग्रुपचे संस्थापक काशिफ खान,व सदस्य संदीप भाऊ सोनेकर,अरीफ अली काशिफ काजी,राहुल लोणारे,हर्षद घोडीले,राहुल घाटे, संकेत बावणे,तेजु दाऊद शेख,आलेख रठ्ठे व इतर सदस्यांचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!