आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्रात सुरक्षितता आणि व्यसनमुक्तीपर श्मार्गदर्शन



वृत्त ....
आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्रात सुरक्षितता आणि व्यसनमुक्ती विषयावर विशेष मार्गदर्शन संपन्न ........

गडचिरोली (प्रतिनिधी ) -
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयात आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्रात नवीन चालकाकरिता सुरक्षितता आणि व्यसनमुक्ती या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते .ह्या विषयावर मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कारप्राप्त ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांना निमंत्रित करण्यात आलेले होते .
याप्रसंगी विभागीय नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे , वाहतूक पर्यवेक्षक जयप्रकाश तनगुलवार , शंकर ढोले प्रामुख्याने उपस्थित होते . प्रास्तविक जयप्रकाश तनगुलवार यांनी केल्यानंतर वक्त्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी विषयानुरूप मांडणी करीत ते म्हणाले , वाहक -चालक हे परिवहन विभागाचे महत्त्वाचे स्तंभ असून दैनंदिन कार्यात सुरक्षितता बाळगल्यास प्रवाशाचे आणि स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवू शकतो . सदैव दूरदृष्टी , चौकसबुध्दी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा अवलंब करावा. एरगोनामिक्स म्हणजे सुरक्षा निर्मिती शास्त्राचा अभ्यास केल्यास चालकांत आत्मविश्वास निर्माण होऊन भविष्यातील अपघातापासून तो दूर राहू शकतो. संपुर्ण सुरक्षिततेचे वातावरण आपल्या विभागात तयार होऊ शकते. उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने त्याकडे बघितले पाहिजेत ,असे ते म्हणाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शंकर ढोले यांनी केले. चालकाकरीता ह्या प्रशिक्षण केंद्राचे विभागीय नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे ह्यांच्या नियोजनात प्रशिक्षण वर्ग सुरू असून विविध विषयावर मार्गदर्शन नविन चालकांना देण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!