चकनिंबाळा येथे बंडोपंत बोढेकर यांचे ग्रामगीता आणि शाश्वत ग्रामीण विकास विषयावर व्याख्यान संपन्न




..चकनिंबाळा येथे ग्रामगीता आणि शाश्वत ग्रामीण विकास विषयावर मार्गदर्शन संपन्न

चंद्रपूर (प्रतिनिधी )- गोंडवाना विद्यापीठ संलग्नित असलेल्या सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार काॕलेज आॕफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर चे राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिर चकनिंबाळा येथे नुकतेच संपन्न झाले. शाश्वत ग्रामीण विकास व युवक या विषयाचे अनुषंगाने ह्या शिबिराचे आयोजन जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात करण्यात आलेले होते . ग्रामगीता आणि शाश्वत ग्रामीण विकास या विषयावर राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे भाषण आयोजित केलेले होते . अध्यक्षस्थानी सरपंच सौ. अनिता पिदूरकर होत्या. कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॕ. सुभाष गिरडे , शिबिर संयोजक प्रा. डाॕ. कल्पना कवाडे , उपसरपंच देवानंद सोनटक्के , ग्रामपंचायत सदस्य अंकुश कौरासे, सौ.चंद्रकला कौरासे, सौ.चंदा उरकुडे, सौ. प्रतिभा ढुमणे, पोलिस पाटील सौ. किरण राजुरकर , सह कार्यक्रम अधिकारी प्रा. किरणकुमार मनुरे, विजय राऊत , तंटामुक्त समितीचे मंगेश टोंगे ,भारत गौरकर , संतोष झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती . प्रास्तविक प्रा. डाॕ.गीरडे यांनी केले तर वक्त्यांचा परिचय प्रा.डाॕ. कवाडे यांनी करून दिला. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज रचित ग्रामगीता ग्रंथाचे ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्व , त्यात स्पष्ट केलेली शाश्वत सूत्रे याबाबत विस्ताराने ओव्याच्या आधारे विश्लेषण केले. बोढेकर यांनी यावेळी ग्रामगीता ग्रंथ सरपंच सौ.पिदूरकर यांना भेट दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!