इंदिरा नगर येथे स्वर्गीय सत्यफुलादेवी पांडुरंगजी कावरे यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ तान्हा पोळा संपन्न
इंदिरा नगर येथे स्वर्गीय सत्यफुलादेवी पांडुरंगजी कावरे यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ तान्हा पोळा संपन्न
विविध पक्षाच्या नेत्यांनी दिली तान्हा पोळ्याला भेट
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - इंदिरा नगर हुतात्मा स्मारक चिमूर च्या राष्ट्रीय महामार्गावर तान्हा पोळा स्वर्गीय सत्यफुलादेवी पांडुरंगजी कावरे यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आले. व हे कार्यक्रम त्यांचे चिरंजीव संदिप कावरे युवा सामाजिक नेते यांच्या तर्फे भरविण्यात आले.या तान्हा पोळ्याला शेकडो बाल - गोपाल नंदी घेऊन सहभागी झाले होते व यावेळी चिमूर नगर परिषदेचे नगर सेवक अब्दुल कदिर शेख , यांच्या तर्फे तथा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या तर्फे चमुंना स्कूल बॅग तथा सायकल व नोट बुक व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.तर सामाजिक युवा नेते संदिप कावरे यांनी विधवा महिलांना साडी वाटप केली तर ईश्वर चिट्टी च्या माध्यमातून अनेक बक्षिस सुद्धा यावेळी बाल - गोपालांना वाटप करण्यात आले यावेळी जि.प.सदस्य तथा विरोधी गटनेते डॉ.सतीश वारजूरकर , धरमसिंग वर्मा , शिवसेना तालुका प्रमुख विलास डांगे , यांनी या तान्हा पोळ्याला भेट दिली व बाल गोपालांचे मनोबल वाढविले अशातर्हेने हा तान्हा पोळा संपन्न करण्यात आला .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!