वेध विधानसभा निवडणुकीचे

वेध विधानसभा निवडणुकीचे


मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष वापरीत आहे नवं - नवीन फंडे


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - आगामी चिमूर विधानसभा निवडणूकीचा रंग सर्वत्र पाहायला मिळत आहे. मतदार, उमेदवार, राजकारण, सत्ता, पक्ष,आरोप - प्रत्यारोप आणि चिमूर विधानसभेचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या आमदारांची निवड केली जाणार याविषयी असणारं कुतूहल असंच काहीसं वातावरण आणि चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये असणाऱ्या कपड्यांच्या दुकानांपासून ते अगदी भांड्यांच्या दुकानांपर्यंत सर्वत्र निवडणूकांचीच छाप पाहायला मिळत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची गिफ्ट , कलापथके , पिशवी आणि नवं नवीन फंडे वापर करण्यात येत आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त माझ्या उंमेदवाराला पक्षाला मतदान कसे मिळेल या एकाच हेतूने  आकर्षीत करण्याचा मार्ग व डिजिटल मार्गाचा अवलंब करून प्रोत्साहित करीत आहेत. या सर्व संकल्पमेमागील मुख्य उद्देश फक्त माझा आमदार कसा निवडून येईल हाच आहे.

या निवडणूकीमध्ये कार्यकर्त्याला सुगीचे दिवस भोगायला मिळणार आहेत कार्यकर्ताला जिभेची ताव व चव चाखायला विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता ची नवीन  पदार्थांची चव या निवडणुकी मध्ये चाखालया मिळनार आहे. ज्यामध्ये अगदी 'पाठवळी,पासून तर पराठा'ही आहे. सकस आहार, चवीष्ट पदार्थ चाखायला मिळणार आहेत कार्यकर्ता यासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थाने पुरवणी आहे, असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात काय तर, पोटोबा खूश ठेवत अनोख्या मार्गाना मतदारांमध्ये निवडणुका आणि मतदानाविषयीची जनजागृती करण्याचा हा एक फंडा खऱ्या अर्थाने सुपरहिट ठरतं की काय आहे. हे खरं. चिमूर विधानसभा निवडणुकी चे ज्वर चढले असून जुने जनकार्याच्या मते आयोगाने निर्णय दिला की प्रचार चालू होतं असे परंतू या वर्षीच्या चिमूर विधानसभेच्या निवडणूकी मध्ये असे चित्र दिसत नसून घोषित कार्यक्रम करायच्या अगोदरच मतदाराच्या गाठी भेटी चालू झाल्या आहेत या वर्षीच्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या धर्मपत्नी व परिवाराला विधानसभेच्या मैदानात आमदारांनी 5 वर्षत केलेल्या कामाचा आढावा सांगित  उतरावे लागत असून ही निवडणूक खूप अटी तठीची होणार आहे की काय? हे मात्र काळ्या दगडावरची रेष आहे, सत्तादारी  आमदाराच्या परिवार जर निवडणुकीच्या मतदाराच्या गाठी भेटीसाठी कामाला लागत असेल तर निवडणूक खुप रस्सीखेच आहे,असे म्हटल्यास वावगे ठरू नये तर दुसरी कडे विद्यमान जी,प,गट नेता सतीश वारजूरकर यांच्या सुद्दा परिवार निवडणुकीत उतरला आहे हे सर्व काही निवडणुकीचे चित्र बघता ही निवडणूक खूप चुरशीची अटीतठी होणार असून विद्येमान आमदाराला जड जाते की काय असे एकंदरीत चित्र दिसत आहे,

यंदा मात्र मतदाराला सुगीचे आनंदाचे दिवस येत आहेत या वर्षीच्या निवडणुकी मध्ये  गणेशोत्सवामुळे विधानसभेत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळनार आहे. गुरूवारी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या जल्लोषात ग्रामीण व शहरी भागात पार पडलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका साधारणपणे १५ - २० ऑक्टोबरच्या दरम्यान पार पडतील. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची  होईल असं बोललं जात होतं. 
  तर आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाकडून विविध विकासकामांच्या भूमीपूजनाचा व  उद्धाटनांचा धडाका लावण्यात आला आहे. या निवडणुकी मध्ये खरच रस्सीखेच आहे  शक्ती जन शक्ती आहे की काय ? या मध्ये कोणती शक्ती निवडुन येणार व कोणाच्या गळात  चिमुर विधानसभेचा आमदाराची माळ पडणार हे मात्र सध्या तरी  मार्ग नाही बस एवढेच....पुढे येणारं निवडणूक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!