30 तासानंतर मजूर जिंकले — 3 लाख मजूरी वसूल — श्रमिक एल्गारचे आंदोलन

गोसीखुर्द प्रकल्पात काम करणाऱ्या मजूरांची मजूरी देण्यांस टाळाटाळ करणाऱ्या के.सी.सी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 3 लाख रूपयाची मजूरी मिळवून घेण्यात श्रमिक एल्गारला यश आले आहे.  काल पासून मूल येथील कार्यकारी अभियंता, असोलामेंढा प्रकल्प कार्यालयात श्रमिक एल्गारने या मजूरांना घेवून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 

गोसीखुर्द प्रकल्पात डांबर फिलींगचे काम करणाऱ्या 8 मजूरांना मागील एप्रिल महिण्यापासून मजूरी देण्यास संबधीत कंपनी टाळाटाळ करीत होती.  हे काम कार्यकारी अभियंता, असोलामेंढा प्रकल्प कार्यालयाचे मार्फतीने झाल्यांने, मजूरी देण्यांची व्यवस्था या कार्यालयाने करावी यासाठी कालपासून मजूरांनी श्रमिक एल्गारच्या महासचिव छाया सिडाम, संगीता गेडाम यांचे नेतृत्वात कार्यालयातच ठिय्या मांडला होता. उपविभागीय अधिकारी खळतकर, तहसिलदार सरवदे यांनी या आंदोलनाला भेट देवून, मजूरांच्या मागण्या रास्त असल्यांचे सांगत  जबाबदारी निश्चित करण्याबाबत संबधीताना आदेश देण्यांचे मान्य केले होते. मजूर व श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यानी काल कार्यालयातच मुक्काम ठोकला. अखेर आज कार्यकारी अभियंता बघमार यांनी के.सी.सी. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्याना नागपूरवरून आणून या मजूरांची मजूरी देण्यांस भाग पाडले.

2,98,037/— रूपयाचा मजूरीचा चेक घेतल्यानंतर श्रमिक एल्गारने आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

मजूरांची मजूरी काढून देण्यात सहकार्य केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी खळतकर, तहसिलदार सरवदे, ठाणेदार चव्हाण, कार्यकारी अभियंता बघमार यांचे श्रमिक एल्गारने आभार मानले आहे.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!