भागे रे मन'ला प्रारंभ


 जिंदगी वाहिनीवर पहिल्यांदाच काल्पनिक कथानकावर आधारित "भागे रे मन' या मालिकेला सोमवारी (ता. 30) पासून प्रारंभ झाला. पद्मिनी नावाच्या स्वतंत्र बाणा जपणाऱ्या 39 वर्षीय भारतीय स्त्रीची कहाणी या मालिकेमध्ये रेखाटली आहे. आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन बाळगणारी पद्मिनी जुन्या रीतिरिवाजांना आव्हान देते. प्रसिद्ध अभिनेत्री करुणा पांडे यांनी मालिकेत पद्मिनी भूमिका साकारली आहे. यासोबतच अभिनेत्री नुपूर अलंकार, डॉ. वेद तापर, चंदन आनंद, प्रिया मराठे, अंकित नारंग आदी कलावंतांनी मालिकेत भूमिका साकारल्या आहेत.
पाकिस्तान आणि टर्कीतील आशय सादर करणाऱ्या मालिकांच्या यशानंतर नव्या व वेगळ्या आशयावर आधारित नवी मालिका जिंदगीने सुरू केली. नव्या आशयावर आधारित ही नॉन फिक्‍शन मालिका आहे, अशी माहिती झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्राइजेस लि. चे मुख्य व्यवसाय अधिकारी सुनील बुच यांनी दिली. दररोज रात्री साडेआठ वाजता "भागे रे मन'चे प्रसारण होईल.