तांदूळ भरलेल्या ट्रकने कबाडीचा उभ्या ट्रकला दिली धडक ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी तर मटन सेंटरवरील कामगाराचा मृत्यू

तांदूळ भरलेल्या ट्रकने कबाडीचा उभ्या ट्रकला दिली धडक 
 ट्रक ड्रायव्हर  गंभीर जखमी  तर मटन सेंटरवरील कामगाराचा मृत्यु 
तळोधी बा.:- नागपूर वरून तांदूळ भरलेल्या ट्रकने उभ्या असलेल्या कबाडी ट्रकला  जोरात धडक दिल्याने ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी तर मटन सेंटरवरील उपचारादरम्यान  कामगाराचा मृत्यू. ही घटना बुधवारी सकाळी 6.10 वाजताच्या  सुमारास  नागपूर - चंद्रपूर  महामार्गावरील  नागभीड तालुक्यातील तळोधी बा. शिवाजी चौकाजवळ घडली. यामध्ये तांदूळ भरलेल्या ट्रक ड्रायव्हर रामेश्वर चेकचंद बालाघाट ठाकरे दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहे . तर माधव नामदेव मांढरे वय 35 यांचे उपचारादरम्यान निधन झाले.हा तळोधी बा येथील रहिवासी आहे.
नागपूरवरून तांदूळ भरलेला ट्रक मूल येथे जात होता. दरम्यान तळोधी बा येथे कबाडी चा सामान भरलेला ट्रक उभा होता. त्यामागे  एक खाली ट्रक पण होता. भरधाव वेगाने मूलकडे जाणाऱ्या  ट्रक एम. एच. 40,वाय 2990 कबाडीचा सामान भरलेला ट्रक एम. एच. 32 Q. 5374 यामध्ये जोरदार धडक दिल्यामुळे तांदूळ भरलेले250 कट्टे धडकेने अस्ताव्यस्त झाले होते. या जोराच्या धडकेमुळे  उभे खाली असेलेले ट्रक 50 मीटर पर्यंत मागे सरकले . रोडच्या कडेला किशोर कटारे याच्या मटन सेंटरवर माधव मांढरे काम करीत असताना ट्रकची धडक बसली. आणि ते गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळताच  पोलिसांनी चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान  माधव मांढरे यांचे निधन झाले. याबाबत तांदूळ भरलेल्या ट्रक ड्रायव्हर रामेश्वर टेकचंद ठाकरे वर  गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास तळोधी (बा.)पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  किशोर मानकर, अंमलदार  हंसराज सिडाम, राहुल चिमुरकर, स्वप्नील चांदेकर, महिला अंमलदार वैष्णवी लेनगुरे, संगीता कोसनवार,अधिक तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!