राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन सांगडी येथे आयोजित

राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन सांगडी येथे आयोजित 

  चंद्रपूर  (प्रतिनिधी)- 
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा सांगडी (दुर्भा) मंडल -बेला, जिल्हा आदीलाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  " राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन २०२५" आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण सांगडी  ग्रामस्थांच्या मदतीने  दि. ६ मार्च ( गुरूवार) व ७ मार्च (शुक्रवार)  रोजी डॉ. मोती महाराज गुरुदेव सेवा मंडळ परिसर सांगडी (दुर्भा) जि. आदिलाबाद येथे होत आहे. 
      समितीचे हे १९ वे संमेलन दोन दिवसीय असून या संमेलनात स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, सामुदायिक ध्यान व प्रार्थना, प्रबोधन संध्या, संमेलनाध्यक्षाची प्रकट मुलाखत, योग निसर्गोपचार मार्गदर्शन, समारोपीय कार्यक्रम, कीर्तन आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
    आयोजन संदर्भात महत्त्वाची सभा सांगडी (दुर्भा) मंडल-बेला,(जि. आदिलाबाद) येथे सामुदायिक प्रार्थना मंदिरात संपन्न झाली.
   यावेळी केंद्रीय समितीचे निमंत्रक डॉ . प्रा.  श्रावण बानासुरे, सरचिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र बोढे , सुभाष पावडे, एड. सारिका जेनेकर,  संजय तीळसमृतकर , प्रभाकर नवघरे , शिवाजी भेदोडकर,  जानकराव नवघरे , सुनील भोयर, श्रीधर पाटील भेदोडकर,  सुधाकर पाटील भेदोडकर, नरसिंगू कोपूलवार , अशोक पाटील भैरवार, नानाजी मालेकर , महेंद्रजी जिट्टावार, प्रभाकर एडपेल्लीवार, भुमा रेड्डी एल्टीवार, दयाकर रेड्डी नल्लावार, मधुकर पाटील भेदोडकर , रवींद्र पाटील भेदोडकर , अनिल पाटील भेदोडकर आदींची उपस्थिती होती.
    संमेलन आयोजन समितीने डॉ. मोती महाराज फंक्शन हाॅल, नवनिर्माणाधिन महादेव देवस्थान, डॉ. मोती महाराज स्मारकास भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!