गोसेखुर्द कालव्यात पडलेल्या निलगाय ला दिले जीवदान.


थंडीत सायंकाळी उशिरा रात्री पर्यंत पाण्यात उतरून साडेतीन तास स्वाब ने चालविला बचाव कार्य.
तळोधी (बा.)
                ब्रम्हपुरी वन विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटातून असलेल्या कालव्यात पडलेल्या निलगायला वन विभाग व स्वाब संस्थेच्या वतीने जीवदान देण्यात आले.
   सविस्तर वृत्त आलेवाही जंगलातील  गोसीखुर्द कालव्यामध्ये एक नर नीलगाय अंदाजे सहा वर्षे वयाचे पडले असल्याची माहिती मिळाली, ही माहिती वन विभागाला कळविण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात आलेवाहीचे वनरक्षक पंडित मेकेवाड सह स्वाब बचाव दलाने घटनास्थळ गाठले. व कालव्यात पडलेली अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाचा नर निलगायला कालव्याच्या पाण्यामध्ये उतरून व्यवस्थित बाहेर काढले. हा बचाव कार्य सायंकाळी थंडीतही साडेचार ते रात्री आठ वाजेपर्यंत चालला. यानंतर पाण्याच्या व कालव्याच्या वर आल्यानंतर मोकळी होताच जंगलात या दिशेने नीलगायने धूम ठोकला. अशाप्रकारे सुरक्षितपणे कालव्याच्या बाहेर काढून निलगाय ला जीवदान देण्यात आले.
   यावेळी आलेवाहीचे वनरक्षक पंडित मेकेवाड, स्वाब से बचाव दल प्रमुख जीवेस सयाम, वनमजूर रामदिन नान्हे, पिआरटी सदस्य महेश बोरकर हे कालव्यात उतरले तर स्वाब चे यश कायरकर, अमन करकाडे, शरद गभने, प्रतीकार बोरकर, हितेश मुगमोडे, वन विभागाचे प्रशांत सहारे, झोडे, गुरणुले हे पि आर टी सदस्य उपस्थित होते.
             विशेष म्हणजे पवनी कडून चंद्रपूर कडे जाणारा हा गोसेखुर्द चा कालवा संपूर्ण तळोधी वनपरिक्षेत्रात च्या जंगलातून जात असल्यामुळे व हा कालवा खुला असल्यामुळे सतत या कालव्यामध्ये नागभीड व तळोधी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी पडत असतात. काही महिन्यांपूर्वी नागभीड वनपरिक्षेत्रात एक रानगवा, त्यानंतर तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये एक नीलगाय, त्यानंतर रानटी डुकरे, काही दिवसांपूर्वी पूर्वी तर पाच चितळे, आणि आज पुन्हा एक नीलगाय, या कालव्यात पडली. सध्या कालवा सुरू करण्यात आला नसल्यामुळे कालव्यामध्ये साचलेला पाणी ही कमरेपर्यंतच असल्यामुळे या प्राण्यांची जीवित हानी झालेली नाही. अशा वन्यप्राण्यांना स्वाब बचाव दल व वन विभागामार्फत सुरक्षित काठण्यात आले. मात्र ज्या दिवशी हा कालव्याचे पाणी सुरू होऊन आठ ते दहा फूट पाण्याचा प्रवाह असेल तेव्हा मात्र सतत वन्यजीव या कालव्यात पडून मेल्याच्या घटना ही घडतीलच. तळोधी - शिंदेवाही व नागभीड वनपरिक्षेत्रातून एका बाजूने हा कालवा तर त्याच्याच दुसऱ्या बाजूने गोंदिया - बल्लारशा रेल्वे ट्रॅक असल्यामुळे गोंदिया बल्लारशा रेल्वे ट्रॅकवर वाघ, चितळ, सांबर, रानगवे, अस्वली, बिबट यांचे मृत्यूच्या घटना ह्या सतत घडत असतात. तर आता या कालव्यामुळे या कालव्यातही पडून वन्यजीव मेल्याच्या घटना घडतीलच. त्यामुळे आता या जंगलात वावरणाऱ्या वन्यजीवांकरिता 'इकडं खाई तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
"या कालव्यावरून वन्यजीवांना ये जा करण्याकरिता जागोजागी काही अंतरावर पूल व कालव्यातून चढण्याकरता पायऱ्या बनवणे गरजेचे आहे. वारंवार या घटना घडत असून याबद्दल प्रसार माध्यमाद्वारे वारंवार लिहिल्या जात आहे. मात्र प्रशासन व गोसीखुर्द बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने वन्यजीवांची मोठी जीवित हानी टाळता येणार नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे." - यश कायरकर, वन्यजीव प्रेमी व अध्यक्ष 'स्वाब फाउंडेशन'.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!