सावित्रीबाई फुले कन्या शाळा पवनी येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक. ०५/१२/२०२४ दिव्यांगाप्रती समाजामध्ये स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षण विभाग पं.स.पवनी तथा सावित्रीबाई फुले कन्या शाळा पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये, साधन व्यक्ती डॉ.मुरलीधर‌ रेहपाडे, विषय तज्ञ महेंद्र वाहने, रत्नदीप लोणारे,राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगाचे जनक लुईस ब्रेल तथा हेलेन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन, दिपप्रज्वलन व अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी मंचावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे‌‌ अध्यक्ष तथा मान्यवर यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व तथा जनजागृती व शासकीय योजना याविषयी उपस्थित सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध चित्रकला,रांगोळी,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने रॅलीचे आयोजन करून जनजागृती पर घोषणा देण्यात आल्या.यावेळी‌ पवनी केंद्रातील विविध शाळांनी आपला सहभाग घेऊन दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.कार्रक्रमाचे सुत्रसंचलन विषय शिक्षक भोजराज पडोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास शहारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गट साधन केंद्रातील कर्मचारी विना गजभिये,सरिता डाखोळे, जनाबाई हेमणे,हिमाल तिबुळे,महेंद्र भुरे,अरविंद लांजेवार, योगेश लोलसरे, राकेश पारधी, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शहारे तथा शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शालेय विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!