नवभारत कन्या विद्यालयात शालेय सप्ताह अंतर्गत "तिथी भोज"
नवभारत कन्या विद्यालय मूल येथे समुदाय सहभागाने विद्यार्थाना तिथी भोज देण्यात आले. मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हे स्नेह भोजन देण्यात आले.
केंद्र शासनाचे आदेशानुसार देशभर शिक्षण सप्ताह 2024 राबविण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत शेवटचा उपक्रम म्हणून समाजाच्या सहभागातून पालक, विद्यार्थी व शिक्षकांना स्नेहभोज देण्यांचा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले. यानुसार मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी पुढाकार घेत विद्यालयातील 500 विद्यार्थीनीसह पालक व शिक्षकांना स्नेहभोज देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, माजी सभापती घनश्याम येनूरकर, राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, संदीप मोहाबेसह अनेक पालक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!