कन्हाळगाव व गोवारपेट येथे महिला धम्म उपाशिका शिबिर




तळोधी (बा.) भारतीय बौध्द महासभेच्या १८व्या स्थापना दिवसांचे निमित्ताने नागभिड तालुक्यातील कन्हाळगाव व गोवारपेट येथे महिला धम्म उपासिका शिबिरांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.मंगल कोसे, प्रा. जगदिश सेमस्कर, सदानंद डेकाटे, शैलेंद्र बारसागडे, अनिल मेश्राम, इजि. मोहन नंदेश्वर, अध्यक्ष सदानंद शेंडे , आशिष मेश्राम, शोभा खोब्रागडे , देवकण्या ढवळे, प्रियका साहरे, मुख्य मार्गदर्शक म्हणून किरणताई रामटेके , रेखाताई पाघडे, व कन्हाळगाव , गोवारपेट येथील बौद्ध उपासक उपाशिका उपस्थित होते. गावागावांत धम्माची आवड निर्माण करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महिला धम्म उपासिका शिबिरांचे आयोजन बौध्द महासभा चंद्रपूर अतंर्गत करण्यांत येते असल्याचे प्रतिपादन डॉ.राजपाल खोब्रागडे यांनी यावेळी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!