चिमूर शहरात अनेक प्रभागांमधील घरा - घरात शिरले पाणी
शहर कांग्रेसच्या वतीने नगर परिषदेला दिले निवेदन
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर नगर परिषद अंतर्गत विविध प्रभागात नाल्या नसल्यामुळे गढुळ पाणी जनतेच्या घरा - घरात शिरले अशी माहिती जनतेने फोनद्वारे दिली असता याची दखल घेत तात्काळ तालुका काँग्रेस चे अध्यक्ष ,आणि शहर काँग्रेस चे अध्यक्ष यांनी स्वतः आपले पदाधिकारी व कार्यकर्ते बोलवुन नगर परिषदला घेराव केला आणि निवेदन देऊन प्रशासनाला तात्काळ नियोजन करण्यास सांगितले. नगर परिषदचे अधीक्षक प्रदीप रानखांब यांनी आपले कर्मचारी यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले.त्यांनी चौकशी करून नगर परिषदचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांना सूचना दिली. व त्यांनी सुध्दा तात्काळ स्वतः घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली. आणि P W D चे अभियंता समीर उपगल्लावार यांना बोलावून jcp मशीन बोलावून पाण्याचा मार्ग काढून दिले.यावेळी तालुका अध्यक्ष संजय घुटके , शहर अध्यक्ष अविनाश अगडे , मिडिया प्रमुख पप्पु भाई शेख , युवक काँग्रेसचे जिल्हा महासचीव , गौतम पाटील, विधानसभा उपाधयक्ष नागेंद्र चट्टे ,प्रदीप साटोने , महिला काँग्रेसच्या सचिव वनिताताई मगरे ,व ग्रामवासी महिला व पुरुष इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!