सुकलेल्या झाडांना चक्क मूल नगराध्यक्षानी दिले पाणी




प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

मूल नगर परिषदेव्दारा  शहरात वूक्षारोपन करण्यात आले. मात्र झाड़े जोपासन्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याने सुकलेल्या झाडाना पाणी देण्याचे काम चक्क नगराध्यक्ष यानी केले. 

हा प्रकार गुजरी चौकातील नगर परिषद परिसरातील आहे. दोन ते तीन दिवसांपासून झाडाना पानी न दिल्याने झाड़े तसेच कुंडीतील मातीला भेगा गेलेल्या असल्यामुळे परिसरातील एका व्यक्तीने नगराध्यक्ष ला माहिती देताच त्यांनी स्वतःचा घरून पाणी आणून झाडांना घातले.  झाडे लावणे झाडे जगविणे हा माझ्या  जिव्हाळाचा विषय आहे असं त्यांनी बोलतांना सांगितले. हिरवाई जोपासा असा महत्वाचा संदेश रत्नमाला भोयर यांनी मूल वासीयांना दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!