नक्षत्राचं देणं काव्यमंच च्या अ.भा.महाकाव्यसंमेलनात साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचा गौरव
वृत्त ...नक्षत्रांचं देणं काव्यमंचच्या राष्ट्रीय अधिवेशनात झाडीपट्टीच्या साहित्यिकांचा गौरव...
ओझर जि. पुणे ........नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचे
अ.भा. मराठी नक्षत्र
महाकाव्य साहित्य संमेलन नुकतेच श्रीक्षेत्र विघ्नहर देवस्थान ओझर,जि. पुणे येथे संपन्न झाले.या दोन दिवसीय संमेलनात संतकाव्य आणि आजची कविता या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर यांनी सहभाग नोंदविला. या महासंमेलनाचे उद्घाटक ओझरचे समाजभूषण जगन्नाथ कवडे ,संमेलनाध्यक्ष लोककवी डॉ. विठ्ठल वाघ,शिवनेरभुषन तात्यासाहेब गुंजाळ,काव्यमंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, डॉ शांताराम कारंडे,मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार जयवंत बामने, अॅड. जयकुमार तांबे,आदी मान्यवर उपस्थित होते.साहित्य सेवा , व्यवसाय प्रशिक्षण , स्वयंरोजगार प्रचार प्रसार आणि व्यक्तीमत्व विकास कार्यात उत्स्फुर्त योगदान दिल्याबद्दल समारोपीय कार्यक्रमात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचा संमेलनाध्यक्ष डॉ.विठ्ठल वाघ यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.या संमेलनात राज्यातील साडेपाचशे कवींचा उत्स्फुर्त सहभाग होता.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!