तडोधी नाईक चिमूर रोडचे काम कासव गतीने



रोडच्या ठेकेराचे हेतुपरस्पर दुर्लक्ष



चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )

चिमूर: - चिमूर तालुक्यातील  चिमूर ते तळोधी नाईक रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरनाचे काम बाहेरील ठेकेदार करत असून त्या रस्त्याचे काम संथ गतीने होत आहे तलोधी नाईक गावच्या लोकांना आणि त्या गावाला लागून असलेल्या ईतर गावकरी अनेक लोकांना चिमूर तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात व उप जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी ये - जा करावे लागत असल्याने या संथ गतीने होत असलेल्या रोड च्या कामामुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काडजी पणामुळे  व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे वाहन धारकांना येण्या जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रोड मुळे समोर चालून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या रस्त्यावर वाहनचालकाना स्वतः चा जीव गमवावा लागेल ही पण शक्यता नाकारु शकत नाही. तलोधी नाईक या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा ठेकेदाराला सूचना दिल्या परंतु याकडे हेतुपरस्पर ठेकेदार दुर्लक्ष करत असतांना दिसत आहे याकडे शासनाने आवर्जून लक्ष देऊन काम नियमानुसार करून घ्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!