गोंडामोहाळी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

गोंडामोहाळी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - दिनांक ३ जानेवारी ला ३०० लोकांच्या छोट्याशा गोंडमोहाळी या गावात 

क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांची जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला,गोंडामोहळी या गावातील वर्ग १ च्या विद्यार्थी यांनी  छोट्या मुलांनी आपल्या चिमुकल्या शब्दात सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर प्रकाश टाकला,एकोणिसाव्या शतकात सावित्रीमाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्वतंत्र विचारशक्तीची साथ देत स्त्रियांसाठी, मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. खऱ्या अर्थाने स्वतंत्र, आत्मभान जपणारी, आत्मविश्वासू स्त्रीच्या जडणघडणीची सुरुवात त्यांच्या कर्तृत्वापासूनच होते.असे मनोगत मा,गेडाम साहेब यांनी वेक्त केले,केवळ बहुजन समाजासाठीच नव्हे किंवा केवळ स्त्रियांसाठी नव्हे, तर एकूणच शोषित-वंचितांसाठी सावित्रीमाई फुले यांचे कार्य मौलिक ठरते. आज जगात अनेक क्षेत्रात माहिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या कर्तृत्वाच्या भरवश्यावर नुसतं पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर दोन पाऊले पुढे राहून काम करतांना दिसत आहेत.असे प्रतिपादन मा देविदास महाडोरे यांनी आपल्या प्रस्थाविक मध्ये सांगितले,सरपंचापासून ते राष्ट्रपती होण्यापर्यत, खेळापासून ते नाट्य कलेपर्यत, मजुरी करण्यापासून ते एक यशस्वी उद्योजिका होण्यापर्यत अश्या अनेक क्षेत्रात महिलांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभावी ठसा उमटवला आहे.हि कमाल केली शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि शिक्षणमहर्षी क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांनी.सावित्रीमाईच्या संघर्षामुळे आज महिला सक्षम झाल्या, असे प्रतिपादन कांडलकर सर यांनी केले,एकट्या घरच्या बाहेर जाऊन स्वतःच्या हिमतीवर आपले कार्य करतात. ज्योतिरावांच्या कार्याला सावित्रीमाईची साथ नसती तर कदाचित आज महिलांची काय स्थिती असती हे वेगळे सांगायला नकोच सदर कार्यक्रमास मा,सरपंच मंदा कुंभरे, मा,यशवन्त रंदये,गेडाम साहेब,देविदास महाडोरे पोलीस पाटील ,सुषमा नेवारे अंगणवाडी सेविका,भिसे सर,कांडलकर सर ,सुशीला रंदये,शंकर मोहूर्ले,कविता मोहूर्ले,पिंटू तोडासे,संचालन,विकास खोब्रागडे पत्रकार,संचालन सावित्रीबाई लेखी आचल महाडोरे,आभार प्रदशन मा,यांनी केले स्नेहभोजना चा कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!