राहुलचा अंत्यविधीसाठी परिसरातील अनेकांनी लावली हजरी

अनेकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - तालुक्यातील शेगाव वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अर्जुनी येथील युवक शेगाव येथे गुरुवारी शेती उपयोगी साहित्य घेण्याकरिता आपल्या दुचाकी वाहनाने आले असता शेती उपयोगी साहित्य खरेदी केल्यावर  शेगाव वरून सायंकाळी सातच्या दरम्यान अर्जुनी (तुकुम) येथे जात असताना भेंडाळा ते चारगाव जवळ म्हशीला जबर धडक बसून अर्जुनी येथील एक ठार एक गंभीर जखमी झाले.
सगळीकडे शेतीची कामे सुरू असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्याकरीता युवा शेतकरी राहुल दामोधर जुंभाळे वय 32 वर्षे व सोबत असलेला युवक राजेंद्र देशमुख वय ४५ वर्षे हे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती शेगाव पो.देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळ पंचनामा करून वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. राहुल जुंबाळे यांना डॉक्टर यांनी मृत घोषित केले. व देशमुख हा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. परिसरात शेती हंगामाला वेग आला असून मोठ्या प्रमाणात शेती विषयक साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेगाव बु येथे यावे लागते. त्यातच रस्त्यावर ठिक - ठिकाणी  मोकाट असलेल्या जनावरे राष्ट्रीय महामार्ग वर मोकाट फिरत असल्याकारणाने नेहमीच छोटे मोठे अपघात घडतंच असतात रस्त्याने गावाकडे जात असताना अचानक म्हैस रस्त्याच्या मधोमध येऊन दुचाकीची म्हशीला धडक लागली होती.मृतक राहुल जुंबाळे हा युवा शेतकरी पुत्र आपल्या कुटुंबातील एकुलता एक होता त्यामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसलेला आहे. त्याला एक १ वर्षाचा मुलगा असून अगदी अल्प वयातच पोरके होण्याची वेळ आलेली आहे. राहुल याचे पच्यात शेतकरी वडील,आई, पत्नी, मुलगा असा बराचसा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस  हे करीत आहे.राहुलचा अंत विधी अर्जुनी येथील स्मशानभूमीत पार पडला असून अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकासहीत परिसरातील नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!