१९ वर्षीय मुलगा गेला बैलासह वाहून
बैल जोडीचा प्रवाहातच झाला मृत्यू
चिमूर तालुक्यातील मजरा येथील घटना
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.०७/०८/२०२४ ला चिमूर तालुक्यातील मजरा येथील समीर राणे वय १९ वर्षे रहिवासी असून शेतातून सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान बैल जोडी घेऊन मजरा येथे घरी जात असतांना भानसुली ते मजरा मार्गावरील पुलावरून पाण्याचा वेग जास्त असल्याने बैल जोडी व मुलगा दोघेही वाहून गेल्याने अजूनही मुलगा नदीच्या प्रवाहात आहे शोध मोहीम सुरूच असल्याने गावात मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!