लाडकी बहीण योजनेत फक्त दोन महिन्याची तरतूद - सत्कार सभेत विरोधीपक्षनेते वडेट्टीवार गरजले @ व्याहाड खुर्द येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. किरसान यांचा सत्कार
लाडकी बहीण योजनेत फक्त दोन महिन्याची तरतूद - सत्कार सभेत विरोधीपक्षनेते वडेट्टीवार गरजले
@ व्याहाड खुर्द येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. किरसान यांचा सत्कार
सावली ( विजय कोरेवार) - निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली परंतु बजेटमध्ये तरतूद फक्त दोन महिन्याची आहे. निवडणुकापर्यंत लाडकी बहीण राहणार असून त्यानंतर हे विसरणार आहेत अशी टिका सरकारच्या धोरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे नवनिर्वाचित खासदारांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलांच्या वर्षावात जंगी स्वागत सत्कार करण्यात आले.
गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नामुळे बारामती पेक्षाही जास्त पाण्याची सुविधा या परिसरात होत आहे. आपली सरकार आल्यास घरकुलाची किंमत तीन लाख करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. जनतेच्या प्रश्नासाठी सभागृहात लढतो आहे, राज्याची धुरा आपल्याकडे असल्याने विधान सभा निवडणुकीची धुरा कार्यकर्त्यांनी सांभाळावी असा सल्लाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
सत्कारमुर्ती नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी माझा सत्कार म्हणजे सर्व मतदारांचा सत्कार असून जो विश्वास जनतेनी दाखविला त्याला तडा जाऊ देणार नाही. चिमूर गडचिरोली च्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन असे सत्काराला उत्तर दिले.
यावेळी मंचावर माजी जिप अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, गडचिरोली जिल्हा काँगेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, गडचिरोली माजी जिप अध्यक्ष अजय कांकडालवार, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, सावली तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, सावली नगराध्यक्ष लता लाकडे, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, बाजार समिती सभापती हिवराज शेरकी, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार, मनोहर पोरेटी, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, सिंदेवाही तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, माजी सभापती विजय कोरेवार, माजी सभापती राकेश गडमवार, शहराध्यक्ष विजय मुत्यलवार, माजी अध्यक्ष यशवंत बोरकुटे, युवा अध्यक्ष किशोर कारडे, शहर महिलाध्यक्ष भारती चौधरी उपस्थित होते. निखिल सुरमवार यांचे पटांगनात झालेल्या सत्कार कार्यक्रमाचे प्रस्ताविक नितीन गोहणे यांनी केले तर संचालन चंचल रोहनकर यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!