आई बाबांच्या स्मृती दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य व ब्लँकेटचे वाटप
आई बाबांच्या स्मृती दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य व ब्लँकेटचे वाटप
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, शाखा चंद्रपूर, तालुका मुल
मुल - नागपूर विभाग सहसचिव तथा ओबीसी सेल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी(शिक्षक) यांच्या मातोश्री आणि नागपूर विभाग अध्यक्षा रत्ना चौधरी यांच्या सासुबाई श्रीमती चंद्रभागा रुषीदेव पाटील चौधरी यांचे २७/१२/२०२३ ला वृद्धापकाळाने निधन झाले.योगायोगाने स्व.रुषीदेव पाटील चौधरी यांचा स्मृतिदिन आणि स्व.चंद्रभागा चौधरी यांचा तेरावा एकाच दिवशी आल्याने आई बाबांचा स्मृतीदिन आणि तेरावा याचे औचित्य साधून चौधरी परिवाराने आगळावेगळा उपक्रम घेण्याचे ठरविले.व परंपरेला फाटा देत तेराव्याला अधिकचा खर्च न करता शिक्षणाबद्दलची स्व. रुषीदेव पाटील चौधरी यांची तळमळ आणि माझ्या गावातील लोकांना सर्व सुविधा मिळाव्यात हे प्रयत्न लक्षात घेऊन चौधरी परिवाराकडून त्यांचे स्वगाव चिमढा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, नोटबुक पेन,गरजु महिलांना ब्लॅंकेट आणि नवभारत विद्यालय मुल येथील पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तेजस्विनी नागोसे मॅडम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, रत्ना चौधरी नागपूर विभाग अध्यक्षा, गुरुदास चौधरी नागपूर विभाग सहसचिव, यशवंत देवगडे मुल तालुका संघटक,दुर्गे, विप्लव चौधरी, युवराज चौधरी, सौ.मायाताई गुरनुले, श्रीमती छायाताई वाढई, श्रीमती नयना गुरनुले, रुपाली चौधरी, सुरेखा चौधरी, सुबोध चौधरी, शंतनु गुरनुले,अन्वय चौधरी, हिमांशु वाढई,.अशोक झाडे मुख्याध्यापक न.भा.वि.मुल,शिक्षकवृंद नवभारत विद्यालय मुल,श्री.जमनादास गोंगले पो.पा.चिमढा, हिवराज ठेमस्कर ग्रा.पं.सदस्य, धनराज मोहुर्ले,बलकी सर,बोधलकर सर,बोरकुटे सर,कुळमेथे मॅडम,नंदेश्वर मॅडम आणि विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!