ओबीसींच्या मागण्यासाठी सावली बंद - सावली शहर ओबीसी नेत्यांचा पुढाकार
सावली - ओबीसींच्या मागण्या संदर्भात चंद्रपूर येथे ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी उपोषण सुरु केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळे आंदोलन सुरु होते. 30 सप्टेंबरला जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले मात्र शासनाने ओबीसी शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेत असल्याचे ओबीसी नेत्यांनी जाहीर केले. परंतु मागण्या लेखी स्वरूपात न देता शासन दिशाभूल करीत असल्याने सावलकर आंदोलनावर ठाम राहून बंद ठेवण्याचे आवाहन होते. व्यापारी व सावली करांनी हा बंद ठेऊन उत्सपूर्त प्रतिसाद दिला.
ओबीसी महासंघाचे वतीने चंद्रपूर व नागपूर येथे उपोषण आंदोलन मागील दोन आठवड्यापासून सुरु होते. चंद्रपूर येथील उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती गांभीर झाल्याने उपचाराकरिता भरती होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोको आंदोलन. सरकारची तिरडी आंदोलन, तालुक्यात लाक्षणिक आंदोलन करण्यात आले व 30 सप्टेंबरला जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. 29 सप्टेंबरला ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे व प्रमुखांची शासनाने बैठक बोलावली. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचेसोबत झालेल्या बैठकीत मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देणार नसल्याचे शासनाने सांगितले व चंद्रपूर व नागपूर येथील उपोषण सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः येणार असल्याचे जाहीर केले. या आश्वासनावर विश्वास ठेवत ओबीसी शिष्टमंडळाने जिल्हा बंद न करण्याचे आवाहन केले. मात्र सावली येथील ओबीसीना मान्य नसल्याने त्यांनी बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनास सावली वासियांनी प्रतिसाद देत बंद पाळत ओबीसींच्या मागणीला प्रतिसाद दिला. यावेळी ओबीसी कार्यकर्ते विजय मुत्यालवार,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, अमर कोणपत्तीवार,नगर पंचायत सावलीचे नगरसेवक गुणवंत सुरमवार,नितेश रस्से, प्रीतम गेडाम, सचिन संगीडवार तसेच मनोज चौधरी, भोगेश्वर मोहुर्ले, आकाश खोब्रागडे, निखिल दुधे, प्रशांत राईचवार, कमलेश गेडाम, किशोर घोटेकर, अनिल गुरनुले आदी सावली शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!