१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी वर पोक्सो व अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल




तळोधी बा: नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी स्वप्ननील उर्फ बालाजी सुखदेव सहारे वय २९ वर्ष यांच्या वर तळोधी बा. पोलीस स्टेशन मध्ये पोक्सो व अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 
       नवरगाव येथील आरोपी  खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होते. त्या चे शाळेत शिकणाऱ्या मुलीसोबत प्रेम करून अनैतिक संबंध ठेवले. त्यामुळे तळोधी बा. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार वरून आरोपी विरोधात अपराध क्र. १५६/२०२३ कलम ३६३,३६६,३६० अ, ३७६  n(३७६-३) सह कलम ६ पोक्सो व अनुसूचित जाती प्रतिबंधक नुसार कारवाई करून आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपीस न्यायालयाने तीन दिवसाचा पी. सी. आर. दिलेला आहे.ब्रम्हपुरी चे पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर कोसरे   साहेब व तळोधी चे ठाणेदार मंगेश भोयर पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!