चिमूर तालुक्यात सट्टा व्यवसाय जोमात पोलीस प्रशासन कोमात
ओपन क्लोज च्या नादी सुरु झाली बेरोजगारी
अवैध सट्टा व्यवसायामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - अनेक वर्षांपासून सट्टा व्यवसायावर बंदी असतांना झटपट श्रीमंती चा मार्ग म्हणून तरुण वृद्ध महिला पुरुष यामध्ये जणू स्पर्धाच लागली या सट्टा व्यवसायास खुलेआम परवानगी दिल्यागत पान ठेला , चहा टपरी तर काहींनी हा व्यवसाय अगदी मोबाईल तसेच व्हॉट्सऍप ग्रुप च्या माध्यमातून सुरु केला आहे याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे या अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे.याचाच फायदा घेत चिमूर शहरात विविध प्रकारच्या अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे़.अशा व्यवसायाकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे.शहरातील विविध भागात सट्टा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी (एन.ओ.सी) दिली की काय ?असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे.
चिमूर तालुक्यामध्ये कोणताही रोजगार म्हणून कंपन्या व उधोग धंदे नसल्याने याठिकाणी बारावीपर्यंत व पदवीधर शिक्षण घेतल्यानंतर चिमूर शहरातील ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, त्यापेक्षाही कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा या अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच सट्टा पट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरूणांनी सट्टा पट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!