तळोधी येथे हायवेवर पंचर दुरुस्ती करणाऱ्या बिहारी व्यावसायिकाची आत्महत्या काही दिवसांपासून पासुन मानसिक तणावात असल्याची माहिती.
तळोधी येथे हायवेवर पंचर दुरुस्ती करणाऱ्या बिहारी व्यावसायिकाची आत्महत्या
काही दिवसांपासून पासुन मानसिक तणावात असल्याची माहिती.
तळोधी बा.:
तळोधी बा. पोलीस स्टेशन अंतर्गत नागभिड - चंद्रपूर हायवे वर पंचर दुरुस्ती करून उदर निर्वाह करणाऱ्या बिहारी निवासी ४० वर्षीय मोहम्मद आरिफ अन्सारी या व्यावसायिकाने आपल्या पंचर दुरुस्तीच्या दुकानात दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना. आज सायंकाळी साडेचार 4:30 वाजता च्या दरम्यान घडली. मृतक हा आपल्या भावासोबत आपल्याच दुकानांमध्ये मुक्कामाने राहायचा. मृतक व्यावसायिक बिहार वरून परत आल्यापासून काही दिवसापासून मानसिक तणावात असल्याचे बोलले जात आहे.
मोका पंचनामा करून, त्याच्या नातेवाइकांना माहिती देऊन, त्याचे शव विच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे नेण्यात आले. अधिक तपास तळोधी बाळापुर पोलीस स्टेशनचे पी. एस. आय. आकाश कुमार साखरे, यांच्या मार्गदर्शनात तळोधी पोलिस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!