मुख्याध्यापक विलास हिंवज यांच्या मार्गदर्शनाखाली ईरणी नदी मध्ये बांधण्यात आला वनराई बंधारा
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - जि.प.उच्च प्राथमिक शाळा सावरी (बिड) बांधला वनराई बंधारा चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून वनराई बंधारा बांधण्याची मोहीम सुरु करण्यात आली .त्या अंतर्गत ३ नोव्हेंबर रोजी बुधवारला जि.प.प्रथमिक शाळा सावरी (बिड) येथिल उच्च श्रेणी मुख्याध्यापक विलास हिंवज यांच्या मार्गदर्शनाखाली हा ईरणी नदी मध्ये वनराई बंधारा बांधण्यात आला हा वन्यप्राणी व गुराढोरांसाठी वरदान देणारा ठरणारा आहे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे सोबतच जवळपासच्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये जि.प.उच्च प्राथमिक शाळा येथिल कर्मचारी व विद्यार्थी आवर्जुन भाग घेतात या प्रसंगी उच्च श्रेणी मुख्याध्यापक विलास हिंवज, नारायण निखाडे, संदीप निखाडे,, रमेश वाकडे ,संदीप ढवस ,विठ्ठल घुमे, स्वप्नील खोब्रागडे,सतिश लाडेकर अनिल निखाडे, यशवंत शास्त्रकार,किसन खामनकार , आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!