प्रजासत्ताक दिनी वृद्धांना दिला बांबू काठीचा आधार...!! ● स्व.प्रसाद राऊत स्मृती चँरीटेबल ट्रस्ट नागभीड चा उपक्रम..!!

🇮🇳🇮🇳

   गेल्या एकरा वर्षांपासून स्व.प्रसाद राऊत स्मृती चँरीटेबल ट्रस्ट नागभीड च्या वतीने प्रजासत्ताक दिनी 'रंगारंग' या शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते... 26 जानेवारी ला 'रंगारंग' या कार्यक्रमाची वाट सगळी जनता मोठ्या उत्साहाने पाहत असते... मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे यावर्षी होणार सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आला.. परंतु ट्रस्ट ने आपले सामाजिक भान जपत टी-पॉईंट चौकातील नागरे आँटो मोबाईल्स च्या प्रांगणात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून यात वंदनीय भारत माता व स्व.प्रसाद राऊत यांना पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली...! 
   यावेळी अध्यक्षस्थानी नागभीड चे प्रथम नागरीक नगराध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे,प्रमुख अतिथी म्हणून नागभीड कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती रमेश पाटील बोरकर, प्रा.डॉ. मोहन जगनाडे सर,रंगारंग कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व जि.प.सदस्य संजय गजपुरे,,नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,कर्मवीर विद्यालयाचे प्राचार्य व सिनेट सदस्य देविदास चिलबुले सर,अँड.रवींद्र चौधरी,अँड.आनंद घुटके, नागभीड चे माजी सरपंच जहाँगीर कुरेशी,सिनेट सदस्य अजय काबरा,सतीश मेश्राम सर,झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन नागरे,उपाध्यक्ष अमोल वानखेडे,मनोज कोहाड,प्रवीण बंडावार यांची उपस्थिती होती...!!!
      यावेळी मान्यवरांच्या हस्ते स  सशस्त्र सीमा बलात निवड झालेल्या झेप निसर्ग मित्र संस्थेच्या करण मुलमुले याचा सत्कार करण्यात आला.. या प्रसंगी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या माध्यमातून बांबू संशोधन केंद्र चीचपल्ली येथे बांबू पासून तयार झालेल्या काठ्या नागभीड येथील वृद्धांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या...व वृद्धांना काठीचा आधार देण्यात आला... हा उपक्रम संपूर्ण परिसरात राबविणार असल्याची माहिती संजय गजपुरे यांनी दिली...!!
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व.प्रसाद राऊत स्मृती चँरीटेबल ट्रस्ट चे कार्यकर्ते तुषार गजभे,पवन फुकट,क्षितिज गरमळे,सलीम शेख,गुलाब राऊत,करन मूलमुले,वीरेंद्र गजभे,प्रीतम रगडे, रितेश गोडे,वृषभ चौधरी,अक्षय जीवतोडे यांनी प्रयत्न केले..!!
   कार्यक्रमाचे संचालन पराग भानारकर यांनी केले तर आभार पंकज गरफडे यांनी मानले..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!