चिमूर शहरात स्वतंत्र अभ्यासिका केंद्र सुरू करण्याबाबत चे निवेदन दिले पालकमंत्र्यांना
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी असंख्य मुले व मुली असून नगर परिषद आणि राजीव गांधी सभागृह अशी २ वाचनालये आहेत. या वाचनालयात जनतेचा त्रास सहन करीत अभ्यास करावा लागतो. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या राजीवगांधी सभागृहात उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून पुस्तके देण्यात आली होती व अधिकारी वर्ग पुस्तके या वाचनालयाला देत असतात परंतु निवडणूक आली कि महिना - महिना विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही.यामुळे स्वतंत्र अभ्यासिका चिमूर शहरात देण्यात यावी याकरिता पालकमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. व यावर चर्चा करून खनिज निधी यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून देणार असे बोलले.यावेळी निखिल डोईजड, गौरव पाटील बंटी शिंदे प्रीतम सातपुते आणि ईतर विद्यार्थी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!