ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ऑनलाईन बुकिंग च्या नावाखाली लाखो रुपयांची अफरातफर

वनरक्षकासह एजंटला अटक

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव कोअर पर्यटन प्रवेशद्वारावर टेकचंद रुपचंद सोनुले, वनरक्षक यांची नियुक्ती आहे.दिनांक.०१/१२/२०२० रोजी टेकचंद रुपचंद सोनुले वनरक्षक हे सचिन संतोष कोयचाडे नावाचे खाजगी व्यक्तीचे मार्फत पर्यटकांकडुन पैसे घेऊन नवेगाव कोअर प्रवेशद्वारावरुन अनाधिकृतपणे जिप्सी सोडत असल्याची क्षेत्रसंचालक यांना माहिती मिळाली. याबाबत सचिन संतोष कोयचाडे हे जिप्सीद्वारे प्रवेश देण्यासाठी स्वतःच्या खात्यावर रुपये ९०००/- पर्यटकांकडुन घेत होते. माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष वनकर्मचारी हे घटनास्थळी गेले असता टेकचंद रुपचंद सोनुले, वनरक्षक व सचिन संतोष कोयचाडे यांनी संगमताने जिप्सीद्वारे पर्यटकांना नवेगाव पर्यटन प्रवेशद्वारातून अवैधपणे प्रवेश देत असल्याची कबुली दिली. संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता असा अवैध प्रकार यापूर्वी अनेकदा केला असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर पोलीस स्टेशन चिमूर येथे लेखी फिर्याद देण्यात आली व एफ.आय.आर.करण्यात आली. सदरहू कार्यवाही करण्यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) ताडोबा सतीश शेंडे व ईतर वनकर्मचारी यांनी याकरिता उत्तम कामगिरी बजावली.
या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन आरक्षण करून देण्यासाठी कोणत्याही ऐजंटची नियुक्ती केलेली नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडून कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, असे आवाहन पर्यटकांना करण्यात येत आहे. या व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी www.mytadoba.org या व्याघ्र प्रकल्पाचे अधिकृत संकेतस्थळावरच परवाना आरक्षित करण्यात यावा.व सावध रहावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!