बाजार चौकातून पेठ विभागाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट कांक्रिटीकरण झाले,मात्र मार्गातील मंदीराकडे ठेकेदारांनी केले दुर्लक्ष मंंदीराची झाली दुरावस्था
शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
शंकरपूर : - तालुक्यातील नेरी येथील गुरु फार्मसी पासून पेठविभागाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच सिंमेटिकरण करण्यात आले परंतू शंकर पंधरे यांचे दुकान आणी घराच्या लगत असलेल्या मंदीराकडे संबंधित ठेकेदारांनी डोळे असुन आंधळ्याची भुमिका घेतल्याने हनुमान मंदीराची दुरावस्ती झाली आहे.
पूरातन काळापासून असलेले हे मंदिर या भागातील नागरीकांचे श्रद्धास्थान आहे येथे पूजा अर्चना नागरिक करित असतात या मार्गावर एका बाजूला हे मंदिर असताना किंवा वाहतुकीला कुठलाही अडथळा होत नाही तरी रस्त्याचे सिमेंटीकरण करतांना ठेकेदारांनी या मंदीराचे सौदर्यीकरणाकडे साफ दुर्लक्ष केल्याने मंदीराच्या सभोवतालील घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे रस्त्याचे उंचीकरण झाल्याने मंदिर खोलगट भागात गेले आहे त्यामुळे मंदीराच्या भोवताल पावसाचे पाणी साचून येथे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे तेव्हा संबधित रस्त्याचे काम करणारे ठेकेदारांनी या मंदिराचे सौदर्यीकरणाकडे लक्ष घालून रस्त्याचे लेवलनी मंदीराचे काम करुन या परिसरातील भावीकांना श्रद्धेचे स्थान निर्माण करुन द्यावे अशी मागणी मंदीराचे परिसरातील नागरीकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!